Tuesday 10 September 2013

कवितेचे विद्यालय



कवितेचे विद्यालय –
आपण सर्व मराठी आहोत. सर्वांना मराठी येते. पण मराठीबाबत लहान-मोठी चुकीची गृहिते मनात दाटलेली असतात. मराठीतील अचूकता साध्यासोप्या शब्दात मांडून, विषयांच्या क्रमवार मांडणीतून, आवश्यक तेवढाच महत्त्वाचा मजकूर देत, टप्प्या टप्प्याने, कवितेच्या लयतालविचारांतून निर्माण होणार्‍या वृत्त, जाती, छंद येथपर्यंत आपण चर्चा करत पोचणार आहोत.
शाळाशाळात कवितेबाबत कसे शिक्षण वयोमानाप्रमाणे देता येईल याची आखणी यानंतर करता येईल. त्यासाठी एकूण विषय परीपूर्णतेने मांडणे आणि चर्चेतून विचारांना निश्चितता येणे गरजेचे आहे. यासाठीची चर्चा ‘कवितेचे विद्यालय’ या नावाने होत आहे.
कोणत्याही भागाबाबत थोडी जरी अनिश्चितता वाटली तर कृपया मनमोकळेपणाने मांडा. त्यातून यात जर काही चुका असतील तर त्या दुरूस्त करता येतील.
या चिषयाबाबतची एकत्रीत चर्चा ‘सर्वसमावेशक मराठी’ या फेसबुकच्या ग्रुपवर होत आहे. त्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे.
https://www.facebook.com/groups/togangal/
‘सर्वसमावेशक मराठी’ ग्रुपवर आपले विचार जरूर मांडा.
आपला, शुभानन गांगल   मोबाईल 9833102727 ईमेल gangal@gmx.com

No comments:

Post a Comment