Tuesday 10 September 2013

1 – व्यंजन, स्वर, अक्षर आणि बाराखडी



कवितेचे विद्यालय –
1 – व्यंजन, स्वर, अक्षर आणि बाराखडी
कविता म्हणता येते. त्याला चाल देता येते. नियमित अंतरावर त्यातल्या ओळींचे तुकडे पडतात. कवितेतील ओळींना टाळी सुद्धा देता येते.
हे असे घडतेच कशामुळे?
याचा उलगडा मराठी भाषेतून अगदी साध्यासोप्या पद्धतीतून करता येतो.
कवितेच्या ओळीत काय असते?
कवितेच्या ओळीत असतात शब्द, शब्दात असतात अक्षरे.
मराठी अक्षरे म्हणजे नक्की काय?
अक्षरात असतात व्यंजन आणि स्वर. पण व्यंजनाचा उच्चार स्वराशिवाय करता येत नाही. म्हणून व्यंजनात त्यानंतर स्वर मिसळून बनतात मराठी अक्षरे. व्यंजनाला बारा स्वर लावून त्याची बनते बाराखडी. ‘प, पा, . . .’, ‘क, का, . . .’ अशा बनतात बाराखडी. स्वरांचा उच्चार तटस्थपणे करता येतो. म्हणून स्वर हे अक्षर ठरते. ‘अ, आ, . . .’ ही अक्षरे ठरतात.
बाराखडी म्हणजे नक्की काय?
मराठीत बारा स्वर आहेत. ‘अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ऍ, ऑ’ ही आहे मराठीतील स्वरांची बाराखडी.
मराठीत चौतीस व्यंजने आहेत. प्रत्येक व्यंजनाला बारा स्वर लावून बारा अक्षरांची बाराखडी बनते. ‘प, पा, पि, पी, पु, पू, पे, पै, पो, पौ, पॅ, पॉ’ ही झाली ‘प’ची बाराखडी. अशी प्रत्येक व्यंजनाची बाराखडी बनते.
‘बाराखडीतून प्रत्येक अक्षराचा अचूक उच्चार कळतो व तो तसाच अचूकपणे करता येतो’, हा बाराखडीचा महत्त्वाचा सिद्धांत आहे.
स्वर-बाराखडीत एकूण 12 (बारा) अक्षरे आहेत. व्यंजन-बाराखडीत एकूण चारशे आठ अक्षरे आहेत (34 X 12 = 408). म्हणजे बाराखडीत एकूण चारशे वीस अक्षरे आहेत.
मराठी बाराखडीचा सिद्धांत –
‘‘‘‘मराठीच्या बाराखडीत स्वर-बाराखडी आणि व्यंजन-बाराखडी आहेत. बाराखडीतील प्रत्येक अक्षराचा शेवट स्वराने होतो, प्रत्येक अक्षराचा अचूक उच्चार कळतो, तो तसाच अचूकपणे श्वास टिकेपर्यंत लांबलचकपणे करता येतो आणि ‘मराठमोळी’ लिपीतील ‘उच्चार, अक्षर, चिन्ह, लेखन व अर्थ’ या पाच गोष्टींना संलग्नपणे कार्यान्वित करतो.’’’’

या विषयाबाबतची एकत्रीत चर्चा ‘सर्वसमावेशक मराठी’ या फेसबुकच्या ग्रुपवर होत आहे. त्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे.
https://www.facebook.com/groups/togangal/

No comments:

Post a Comment