Tuesday 10 September 2013

4 – ‘व्यंजन’ आणि ‘सेकंद’ यांचा परस्पर संबंध



कवितेचे विद्यालय –
4 – ‘व्यंजन’ आणि ‘सेकंद’ यांचा परस्पर संबंध
घड्याळात तास, मिनीटे व सेकंद असतात. तसेच मराठीत शब्द, अक्षरे व व्यंजन-स्वर असतात. साठ सेकंदाचे मिनीट होते. चौतीस व्यंजने आणि बारा स्वर यातून अक्षरे बनतात. वेळ दाखविणारी अनेक कंपन्यांची असंख्य घड्याळे आहेत. तसेच मानवाच्या बर्‍याच भाषा आजही अस्तित्वात आहेत. खेळांच्या स्पर्धात वापरले जाणारे ‘स्टॉपवॉच’ सेकंदाच्या हजाराव्या भागाची नोंद करू शकते. सेकंदाची व्याख्या अचूकतेने देण्यासाठी मानवाने ऍटॉमिक-क्लॉक (अणूंत होणार्‍या कंपनांचा वापर केलेले घड्याळ) बनवले. ‘‘‘Since 1967, the International System of Units (SI) has defined the second as the duration of 9192631770 cycles of radiation corresponding to the transition between two energy levels of the caesium-133 atom’’’ अशी सेकंदाची व्याख्या आहे. त्यामुळे ऍटॉमिक-घड्याळे (ऍटोमॅटीक नव्हेत) किती अचूक वेळ दाखवितात? त्यासाठी ‘‘‘it would neither gain nor lose a second in 20 million years!’’’ असे म्हटले जाते. काय आहे की नाही सायन्सची कमाल! ‘कवितेचे विद्यालय’ या परिसरात या गोष्टी कशासाठी?, हा आपल्याला प्रश्न पडला असेल. याचे अतीशय सुयोग्य व उपयुक्त कारण आहे आणि ते मानवाच्या काव्य क्षेत्रासाठी सर्वसमावेशकता देणारे ठरणार आहे. व्यंजन-स्वर यातून बनलेले अक्षर जेवढे सुक्ष्म, तेवढे त्यातून मानवाला ओळखता येणारी ध्वनीची जाण, नैसर्गिकतेला गाठता येईल एवढी सुक्ष्मतम ठरते, परिपूर्णपणे भाषेतून वापरता येते. मराठी भाषा एवढी सक्षम आणि सुक्ष्मतेतून भव्यतेकडे झेपावणारी आहे. होय, आपण हेच ‘कवितेचे विद्यालय’ यातून अभ्यासणार आहोत.

वेळ मोजण्यासाठी ‘सेकंद’ हा कालमापनाचा छोटा भाग (युनीट) आपण वापरतो. आजवर इतर भाषांनी कवितेतील लयबद्ध अक्षररचनेतील उच्चार-वेळेचे मापन करण्यासाठी ‘लघु-गुरू’ हे प्रमाण वापरले. कारण त्या भाषांना केवळ एवढ्याच सुक्ष्मतेपर्यंत पोचण्याचे स्वाभाविक योगदान अवगत आहे. जरी मराठीनेही आजवर ‘लघु-गुरू’ हेच प्रमाण वापरले असले तरी मराठीचे कळत नकळत वापरता येणारे स्वाभाविक योगदान बरेच सुक्ष्म आहे. मराठी व्यक्तिच्या मेंदूत अक्षर स्थिरावताना हे आपोआप घडते. यातील सर्व बारकावे आपण क्रमाक्रमाने पडताळून बघणार आहोत. केवळ तुमच्या स्वर-यंत्र ते ओठ या निसर्गाने दिलेल्या उच्चाराच्या प्रयोग शाळेचा वापर करून, मराठी व्यक्ति ते जाणून घेऊ शकतात. त्यासाठी कोणत्याही संदर्भ ग्रंथाची आवश्यकता नाही. म्हणजेच सर्वच घड्याळे वेळ दाखवितात पण ऍटॉमिक-घड्याळे जास्त अचूक वेळ दाखवितात तसेच इतर भाषांतून कवितेची जाण निर्माण होते पण मराठीतून कवितेची सुक्ष्मतम जाण निर्माण होते. मराठी ही जणू अत्याधुनिक युगातील ‘ऍटॉमिक-भाषा’ ठरते!

‘व्यंजन’ आणि ‘सेकंद’ यांचा परस्पर संबंध निश्चित करताना प्रथम आपण फिजिक्स मधला साऊंड काय म्हणतो ते थोडक्यात पाहू. मानवाला अंदाजे 85 ते 1100 फ्रिक्वेन्सीचा ध्वनी उच्चारता येतो आणि अंदाजे 20 ते 20000 फ्रिक्वेन्सीचा ध्वनी ऐकू येतो. हे सायन्सने सिद्ध केले आहे. यातील 1/20 सेकंद (0.05 सेकंद) हा भाग मानवाला ऐकू येणारी ध्वनीतील ‘ग्रहण-क्षमता’ (Reception ability) दर्शवतो आणि 1/20000 सेकंद ( 0.00005 सेकंद) हा भाग मानवाला ऐकू येणार्‍या ध्वनीतील ‘धारण-क्षमता’ (Retention ability) दर्शवतो. यातील 1/20 सेकंद (0.05 सेकंद) या कालमापनाला आपण या लेखापुरते ‘क-वेळ’ असे नाव देऊ.

सिनेमा दाखविताना चित्र आणि ध्वनी यांची सांगड घालताना प्रत्येक चित्राच्या 24 फ्रेम एका सेकंदात पुढे पुढे सरकतात. जेव्हा ती एक फ्रेम क्षणभरासाठी स्थिर राहते तेव्हा त्यातून प्रकाश जाऊन आपल्याला दिसण्याची क्रिया घडवली जाते. त्यामुळे स्थिर-चित्रांतून आपणास चलत-चित्रपट आभास होतो, नव्हे जणू तसे आपल्याला दिसते. कवितेचा संबंध दिसणार्‍या गोष्टीशी नसून उच्चार-वेळेशी असतो. पण चलत-चित्रपटात वापरलेला क्षणभराचा, ‘चित्र स्थिर राहण्यासाठीचा वेळ’, कमीतकमी वेळेचे ज्ञान होण्याच्या आपल्या ‘जाणीवांच्या आकलनाशी’ निगडीत असतो. म्हणजे तो अंदाजे वेळ 0.05 सेकंद (1/24 = 0.04166 चा जवळचा अंक) म्हणता येतो. पुन्हा याचा संबंध ‘क-वेळ’ याच्याशी जुळतो, हे लक्षात येते.

पुर्वी गाण्याच्या रेकॉर्डस मिळत त्या 35 वा 45 RPM (Revolution Per Minute) च्या असत. म्हणजे ध्वनीचे रेकॉर्डींग ज्या वेगाने केले आहे त्याच वेगाने ध्वनी प्रसारीत करणार्‍या यंत्राचा वेग असला की रेकॉर्ड केलेला ध्वनी जशाच्या तसा प्रक्षेपीत करता येतो.

भाषेतील सर्वात कमीवेळेत संपणारा आणि निश्चितपणे ऐकू येणारा उच्चार ‘व्यंजन’ ठरतो. आधुनिक युगात वेळेच्या प्रमाणाला आपण ‘सेकंद’ म्हणतो. आता आपण ‘व्यंजन’ आणि ‘सेकंद’ यांचा परस्पर संबंध निश्चित करू. ‘रॅप’ पद्धतीतून जलद उच्चार होऊ शकतो आणि माननिय वाजपेयींच्या भाषणाच्या संथ गतीतूनही (माननिय वाजपेयींची क्षमा मागतो) उच्चार होतो. तेव्हा उच्चारातील ‘व्यंजन’ या वेळेची सर्वसमावेशकता लक्षात घेणे गरजेचे ठरते. वयोमान, लिंग-भेद, उंची, जाडी, शारीरिक ठेवण, वजन, स्थळ, ठिकाण, दिवस-रात्र, महिने-वर्ष, उष्णता-थंडी, आराम-कष्ट, सुदृढ-अशक्त, टवटवीत-थकलेला, संवादातील गरज, भावनेचा अविष्कार, वगैरे भिन्न परिस्थितीचा विचार करून ‘व्यंजन’ आणि ‘सेकंद’ यांचा परस्पर संबंध काहीसा निश्चित करणे गरजेचे ठरते.

‘निमेष’ हे कालमापनाचे भारतीय परंपरेचे प्रमाण आहे. एक निमेष म्हणजे पापणी लवण्यास लागणारा अंदाजे वेळ होय. भारतियांनी वेळेच्या प्रमाणाची आखणी अशी नैसर्गिकपणावर बेतली आहे. अर्थात यात सेकंद एवढी निश्चितता व अचूकता नाही. गद्य, पद्य व संगीत यांच्या योगदानाचा मार्ग मोकळा होणारे, ‘निमेष’ हे वेळेचे प्रमाण ‘लघु-गुरू’ पेक्षा बरेच सुक्ष्म आहे, असे म्हणता येते.

निमिष या वेळेच्या प्रमाणाबाबत बरीच भिन्न कालावधीची कोष्टके भारतीय संस्कृतीतून सापडतात. (1) भारतीय ज्योतिषशास्त्राचा संबंध घेतला तर एक निमेष म्हणजे अंदाजे 4/45 सेकंदाचा (0.08888 सेकंद) वेळ ठरतो. (2) भारतिय संगीतग्रंथांचा संबंध घेतला तर एक निमेष म्हणजे अंदाजे 1/32 सेकंदाचा (0.03125 सेकंद) वेळ ठरतो. हा फरक फारच मोठा आहे. (3) नाट्य-शास्त्रानुसार एक निमेष म्हणजे अंदाजे 1/25 सेकंदाचा (0.04 सेकंद) वेळ ठरतो. (4) नाडीचे ठोके यावरून भारतीय ग्रंथातून मांडलेल्या व्याख्येप्रमाणे एक निमेष म्हणजे सरासरी 1/18 सेकंदाचा (0.0555 सेकंद) वेळ ठरतो. कृपया ज्योतिष, संगीत, नाट्य आणि नाडी अशा शास्त्रांच्या गरजा भिन्न असतात आणि त्यानुसार ‘निमिष’ या वेळेच्या प्रमाणाची मांडणी भिन्न सांगितलेली आहे, हे लक्षात घ्यावे. यात सांगितलेल्या गणितांचा आधार ग्रंथांतून मिळतो.

इतर भाषांपेक्षा सुक्ष्मतम ठरणार्‍या ‘निमिष’ या वेळेच्या प्रमाणाची, ‘लघु-गुरू’ पेक्षा कितीतरी सुक्ष्म ठरणारी, मराठीतील पुढे दिलेली सुत्रे, सर्वसमावेशकाची भुमिका घेणारी ठरतात. ‘सेकंद’ हे वेळेचे आणि ‘लघु-गुरू’ हे ओळीच्या कालमापनाचे आजवरचे सुत्र आपण जाणतो. आता मराठी सादर करत आहे, कवितेच्या ओळींचे सुक्ष्मतम सुत्र. त्याचे नाव आहे ‘व्यंजनकाल’. व्यंजनाच्या उच्चाराला लागणारा वेळ म्हणून याचे नाव ‘व्यंजनकाल’ आहे. सोबतच्या तक्त्यात लघु-अक्षर-काल मांडला आहे. लघु-अक्षर-काल यात ध्वनी आणि विराम दोघांचे वास्तव्य असते. विरामाच्या कोंदणात वावरणार्‍या लघु-अक्षरात साधारणपणे पाच ‘व्यंजनकाल’ असतात. अत्याधुनिक जगतात ध्वनीचे सर्वात सुक्ष्मतम रूप भाषेतून वापरणारी भाषा जागतिकीकरणात जगावर राज्य करणार आहे. मराठीची आजवर सामोरी न आलेली अद्धितीयता, अनोखे वैभव आणि विलक्षण अत्याधुनिकता ‘कवितेचे विद्यालय’ मधून सामोरी येईल असा विश्वास वाटतो.

आपला अभिप्राय देत चर्चेसाठी https://www.facebook.com/groups/togangal/ या ग्रुपवर सामिल व्हावेत ही विनंती.
आपला, शुभानन गांगल   मोबाईल 9833102727 ईमेल gangal@gmx.com

No comments:

Post a Comment